एकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?

Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना साबण सगळेचजण वापरतात. हल्ली बॉडी वॉशदेखील बाजारात आले आहेत. मात्र, आजही घराघरात साबणाचाच वापर केला जातो. मात्र, संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरावा का? त्याचा त्वचेवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया. 

त्वचेची काळजी ही प्रत्येकाला घ्यायलाच हवी. आंघोळ करत असताना हल्ली काही जण त्यांच्या त्वचेनुसार फेसवॉश वापरतात. पण साबण मात्र सगळेजण एकच वापरतात. तसंच, एकच साबण हा हात धुण्यासाठी व आंघोळीसाठी वापरला जातो. पण नकळतपणे त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होताना दिसतो. जर, कुटुंबातील सर्वच सदस्य एकच साबण वापरत असतील तर तो वापरताना काय काळजी घ्यायला हवी याची माहिती असणे गरजेचे आहे. 

साबणाने तुमची त्वचा स्वच्छ होते. त्यावरील मळ, जिवाणू निघून जाते. पण तसंच, त्वचेवरील मॉइश्चरायझरदेखील निघून जाते. त्यामुळं आंघोळीसाठी साबण निवडताना असा निवडा ज्यामुळं त्वचा मऊ राहू शकते. त्वचा हायड्रेट राहिल आणि पोषण देईल, अशा साबणाचा वापर करावा. तसंच, आंघोळीनंतर त्वचेला तेलकटपणा येणार नाही असं मॉइश्चरायझर नक्की वापरावं. 

सगळ्यांनी एकच साबण वापरावा का?

सगळेजण एकच प्रकारचा साबण वापरत असल्यास त्यावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया साबणावर चिटकून असतात. साबणाच्या एका वडीवर 2 ते 5 प्रकारचे किटाणू व बॅक्टेरिया असतात. या जंतूंमध्ये ई-कोला, साल्मोनेला, शिगेला बॅक्टेरिया, नोराव्हायरस आणि रोटा व्हायरस सारख्या विषाणूंचा समावेश असतो. त्यातील काही बॅक्टेरिया जखमा व ओरबाड्यांद्वारे पसरतात तर काही विष्ठेद्वारे पसरतात. 

जर तुम्ही सर्व कुटुंब मिळून एकच साबण शेअर करत असाल तर वापरण्यापूर्वी तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसंच, साबण थेट त्वचेवर लावण्यापूर्वी आधी हातांवर चोळून त्याचा फेस तयार करा आणि मगच शरीरावर लावा. तसंच, साबण ओला असताना वाळवू नका. कारण ओल्या साबणावर अधिक बॅक्टिरिया वाढवण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Source link

Related Posts

उपचार न केलेल्या प्रसुतिपश्चात उदासीनतेशी संबंधित शारीरिक आणि मानसिक आरोग्य गुंतागुंत

इशिता दत्ता…

स्कॉच प्रशंसाच्या चार नवीन शैलींमध्ये उत्कृष्ट व्हिस्कीचा आस्वाद घ्या

स्कॉच व्हिस्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

‘शोले’ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम

‘शोले’ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम

Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story

Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story

‘ही तर बॉलिवूडची दुसरी जया बच्चन’, काजोलने सर्वांसमोरच अजय देवगणला…| Zee 24 Taas

‘ही तर बॉलिवूडची दुसरी जया बच्चन’, काजोलने सर्वांसमोरच अजय देवगणला…| Zee 24 Taas

Baba Siddique Closest Bollywood Actor is not Salman Khan or Shah Rukh Khan Sanjay Dutt First Arrived at Lilavati Hospital After Zaheer Iqbal Father death; सलमान-शाहरुख नाही तर ‘हा’ अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव….

पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी, आता आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार, इतकी आहे संपत्ती

पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी, आता आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार, इतकी आहे संपत्ती

अक्षयसोबत ट्विंकल खन्ना झाली रोमँटिक क! आई-बाबांची मुलांना वाटली लाज; म्हणाली- 'मुलांना…'

अक्षयसोबत ट्विंकल खन्ना झाली रोमँटिक क! आई-बाबांची मुलांना वाटली लाज; म्हणाली- 'मुलांना…'