‘नवरा माझा नवसाचा 2’ सुपरहिट! धर्मवीर चित्रपटाची काय अवस्था? तीन दिवसांत किती कमावले, पाहा Box Office रिपोर्ट

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) चित्रपटाला चांगलं यश मिळालं आहे. तसंच नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 (Dharmveer) चित्रपटही चांगली कामगिरी करत आहेत. ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘देवरा’ चित्रपटाचं आव्हान असतानाही दोन्ही मराठी चित्रपटांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे जाणून घ्या. 

‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटासमोर नुकतंच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर 2 आणि देवराचं आव्हान असतानाही यशस्वी कामगिरी करत आहे. खासकरुन शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने चांगली कमाई केली. 

दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी 51 लाख, शनिवारी 1 कोटी 26 लाख आणि रविवारी 1 कोटी 67 लाखांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात 11.74 कोटी कमावणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 3.44 कोटींची गल्ला जमवला आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण 15.18 कोटी कमावले आहेत. 

धर्मवीरची जबरदस्त घोडदौड

धर्मवीर 2 चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. स्त्री 2, देवरा आणि नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटांचं आव्हान असताना शनिवारी चित्रपटाने चांगली कामगिरी केली. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत 31.77 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ओपनिंग विकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली असून, इतर चित्रपटांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. 

रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने शुक्रवारी 1.92 कोटी, शनिवारी 2.53 कोटी आणि रविवारी 3.47 कोटींची कमाई केली. तीन दिवसांत चित्रपटाने 7 कोटी 92 लाख कमावले आहेत. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सुट्टी असल्याने कमाईवर त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 

नवरा माझा नवसाचा 2 आणि धर्मवीर 2 च्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सुखद धक्का मिळाला आहे.

Source link

Related Posts

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

Alia Bhatt…

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

Raj Thackeray…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल