शक्तिमानची भूमिका मला साकारू द्या, 3 तास केल्या विनवण्या… मुकेश खन्नांचे फॅन्स म्हणतात, रणवीर नकोच!

Ranveer Singh Shaktimaan : बऱ्याच काळापासून ‘शक्तिमान’ या मालिकेवर चित्रपट बनवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर  रणवीर सिंगच्या नाव यावेळी समोर येतंय. शक्तिमान अशी ओळख असणारे अभिनेता मुकेश खन्नानं आता या सगळ्या चर्चेत रणवीरच्या कास्टिंगवर वक्तव्य केलं आहे. खरंतर, या आधी जेव्हा रणवीरच्या नावाची चर्चा सुरु होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की न्यूड फोटोशूटमुळे जो अभिनेता चर्चेत होता. ज्याची एक वेगळी प्रतिमा आहे, तो शक्तिमानसारखी भूमिका साकारू शकत नाही. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश यांनी सांगितलं की रणवीरनं त्यांची भेट घेतली आणि जवळपास 3 तास त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की त्याला शक्तिमानची भूमिका करू द्या. 

‘बॉलिवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सांगितलं की ‘आता लोकांना माहित आहे की रणवीर माझ्याकडे आला होता. शक्तिमानच्या भूमिकेसाठी त्यानं माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मी लपवू शकत नाही, कारण नंतर लोक म्हणतील की मी रणवीरची स्तुती केली आणि त्याला एक उत्तम अभिनेता म्हटलं. त्यानंतर रणवीर शक्मिमानची भूमिका साकारणार यावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या, मात्र तरीही मी या गोष्टीवर सहमत नाही.’

मुकेश खन्ना म्हणाले की, ‘माझं सोनीसोबत वाद आहे आणि मी एक व्हिडीओ शेअर करत स्पष्ट केलं की मी रणवीरला भूमिका साकारण्यासाठी मंजूरी दिली नव्हती आणि त्याचं कारण हे आहे की रणवीर माझ्यासमोर 3 तास बसला, पण सगळ्यात शेवटी मला त्यांना सांगावं लागलं की त्याच्या चेहऱ्यावर जे दिसायला हवं ते नव्हतचं. तो चंचल दिसतो, अशा व्यक्तीप्रमाणे जो दुसऱ्यांचं मतपरिवर्तन करू शकतो.’

हेही वाचा : ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटासाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या राज कपूर यांची पहिली पसंत, पण…

दरम्यान, मुकेश खन्ना यांनी केलेल्या वक्तव्याशी नेटकरी देखील सहमत आहेत. या संबंधीत पोस्ट जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली त्यानंतर नेटकऱ्यांनी ते देखील रणवीर सिंगच्या कास्टिंगच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडच्या पेजवर असलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कृपया शक्तिमानचा नाश करु नका.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही आमचे बालपणीचे हीरो आहात, कृपया त्याला शक्तिमान बनवू नका.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मुकेश खन्ना जे काही बोलले त्याला मी देखील सहमत आहे कारण मी सुद्धा रणवीरला शक्तिमानच्या भूमिकेत पाहू शकत नाही… हृतिक रोशन ही भूमिका योग्य पद्धतीनं साकारू शकतो इतकंच नाही तर सुरज पांचोली देखील शक्तिमानची भूमिका साकारू शकतो.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सर, हो कधीच बोलू नका.’

Source link

Related Posts

‘हे लॉरेन्स बिष्णोईचं प्राणीप्रेम की देवाचा….’, रामगोपाल वर्मा यांचं ट्विट, म्हणाले ‘सलमानने हरणाची शिकार केली तेव्हा’

बॉलिवूड दिग्दर्शक…

‘मी तुझी…’, रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

पुढीलबातमी आलिया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

‘हे लॉरेन्स बिष्णोईचं प्राणीप्रेम की देवाचा….’, रामगोपाल वर्मा यांचं ट्विट, म्हणाले ‘सलमानने हरणाची शिकार केली तेव्हा’

‘हे लॉरेन्स बिष्णोईचं प्राणीप्रेम की देवाचा….’, रामगोपाल वर्मा यांचं ट्विट, म्हणाले ‘सलमानने हरणाची शिकार केली तेव्हा’

‘मी तुझी…’, रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

‘मी तुझी…’, रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा