Ayesha Singh Struggle: बॉलिवूड असो किंवा टीव्ही जग, नवीन आणि छोट्या शहरातून येणाऱ्यांसाठी हा मार्ग सोपा नसतो. रंग, रुप, शरीर, इंग्रजी, पार्श्वभूमी अशा प्रत्येक पैलूवर टोमणे मारले जातात. मुंबईत अनेक वर्षे संघर्ष करून देखील जेव्हा अभिनयात काम मिळत नाही तेव्हा लोक परत आपल्या गावी जातात. असच काही दिवसांमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्री आयशा सिंग हिच्यासोबत देखील घडलं आहे.
‘गुम है किसी के प्यार में’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आयशा सिंग हिने एकदा मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. कायद्याची पदवी घेतलेल्या आयशाने मुंबईत खूप संघर्ष केला आणि मग तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
कसा होता आयशाचा मुंबईमधील संघर्ष
आयशाने ETimes शी संवाद सांधताना अशाच काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, ती शालेय जीवनापासून अभिनय करण्याचा प्रयत्न करत होती. ती तिच्या मित्रासोबत सनी देओलचे चित्रपटातील धाई किलो का हाथ, चड्डा साहेब यांसारखे प्रसिद्ध सीन करायची. पुढे ती म्हणाली की, मी नशीबवान होते की मला काही जाहिराती मिळाल्या. परंतु मला जे करायचं होतं त्यासाठी मला अनेक दिवस वाट पहावी लागली.
तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्हाला माहिती नसते की ऑडिशन्स कुठे होतात. या काळात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे असं कधी होत नाही की, तुम्ही स्टुडिओ किंवा प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेला आणि तुम्हाला लगेच काम मिळालं. पण मला पहिला शो दिल्ली अरमानो की मिळाला. त्यानंतर लगेचच दुसरा शो आला.
परत आली होती आग्राला
पुढे आयशा म्हणाली की, ”गुम है किसी के प्यार में’ भेटण्यापूर्वी ती मी खूप चिडली होती. एक वेळ अशी आली की मला अभिनय सोडून परत जायचे होते. मी ठरवले होते की आग्राला परत जायचे. तिथे जाऊन बँकेची नोकरी करायची. आग्राला येण्यापूर्वी मी ”गुम है किसी के प्यार में”साठी ऑडिशन दिले होते. आग्राला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला शोसाठी फोन आला. असं झालं नसतं तर काहीतरी वेगळं करायचा विचार केला होता.
खूप मेकअप कर
सिद्धार्थ काननला मिळालेल्या नकाराबद्दल बोलताना आयशा म्हणाली की, तो माझा पहिला नकार होता. मी एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गेली होते. माझ्याकडे बघत तो म्हणाला, बेटा तू सुंदर नाहीस आणि खूप मेकअप कर. मग आपण बोलू, ही पहिलीच वेळ होती आणि त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते.