अंकिता लोखंडे देणार गोड बातमी? मुनव्वर आणि अली मस्करी करत म्हणाले, ‘पोटातं दुखतंय…’

Ankita Lokhande Good News : लाफ्टर शेफ्स हा एक असा शो आहे जिथे प्रेक्षक हे सेलिब्रिटींना जेवण बनवताना पाहतो. या शोमध्ये निया शर्मा, अंकिता लोखंडे आणि करण कुंद्रापासून अनेक सेलिब्रिटी सहभागी आहेत. सध्या या शोमधला प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एका प्रोमोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या पोटात दुखण्याची तक्रार करताना दिसते. तर इतर लोक हे ऐकताच त्याला वाढवत तिची खेचतात आणि म्हणतात की तिच्यात प्रेग्नंसीची लक्षणं दिसत आहेत. प्रोमोत बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी देखील दिसत आहे. तर या शोमध्ये तो पाहुणा म्हणून दिसणार आहे. 

प्रोमो क्लिपच्या सुरुवातीला विकी जैन दिसतो. तो अंकिता लोखंडेला विचारतो की ती ठीक आहे ना. उत्तर देत ती पोट दुखत असल्याची तक्रार करते. तिला त्रास होत असल्याचं पाहून सगळे लोक तिच्या आजुबाजूला येतात. मुनव्वर फारुकी म्हणतो, ‘चक्कर येऊन पडली, आनंदाची बातमी आहे?’ या सगळ्यात अली गोनीनं तिची मस्करी करत म्हटलं की तिला तिचा पाय नेहमी पेक्षा आज जरा जास्त जड वाटतोय का… पाय उचलायला तिला त्रास होतोय का? 

याशिवाय अर्जुन बिजलानी, भारती सिंग, रीम शेख आणि इतर काही स्पर्धक येऊन तिथे त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. तर विकी जैन त्याची पत्नी अंकिताच्या कपाळावर किस करतो. तर शेवटी कृष्णा अभिषेक त्या दोघांना चिडवण्यासाठी बोलतो की कशा प्रकारे विकी लवकर वडील होणार आहे. तर अंकिता आणि विकीनं प्रेग्नंसीवर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. प्रोमोला पाहून असं वाटतंय की या सगळ्याला मजेशीर पद्धतीनं घेत सगळे त्याची फक्त मज्जा घेतात. 

प्रोमोच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत अंकिताला ट्रोल करत आहेत. तिचं प्रत्येक शोमध्ये हे सुरु असतं असं अनेकांचं म्हणणं आहे. अंकिताला प्रत्येक शोमध्ये प्रेग्नंसी आठवते. 

हेही वाचा : ‘डंके की चोट पे…’ गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’ हिंदीत झळकणार!

दरम्यान, आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. अक्षय कुमार, वाणी कपूर, श्रद्धा कपूर, कंगना रणौत आणइ फरदीन खानसोबत अनेकांनी हजेरी लावली होती. तर शोमध्ये अली गोनी-राहुल वैद्य, करण कुंद्रा आणि अर्जुन बिजलानी, निया शर्मा आणि सुदेश लहरी, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, रीम शेख आणि जन्नत जुबैरसारखे स्पर्धक दिसणार आहेत.



Source link

Related Posts

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

Vidya Balan…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

शेवटचे अपडेट:26…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’