Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा अंडररेटेड कलाकारांपैकी एक असल्याचं अनेकदा म्हटलं जातं. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण तरी देखील त्याच्या अभिनयाच्या जोरावर तो सगळ्यांची मने जिंकू शकला नाही. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्यानं त्याला काम मिळत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र, अभिषेकनं सतत चांगले चित्रपट देत हे साध्य केलं आहे की तो या इंडस्ट्रीमध्ये त्याच्या वडिलांच्या जोरावर नाही तर त्याच्या अभिनयाच्या जोरावर आहे.
अभिषेक बच्चन हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यापेक्षा त्यांच्या प्रॉपर्टी इन्वेस्टमेंटमुळे चर्चेत आहे. सध्या अशी बातमी समोर आली आहे की अभिषेक बच्चला भारतीय स्टेट बॅंक (SBI) कडून दर महिन्याला 18.9 लाख रुपये मिळतात. चला तर जाणून घेऊया त्या मागचं खरं कारण काय आहे.
रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चननं त्याच्या जुहूमध्ये स्थित असलेल्या आलिशान बंगला ‘अम्मू आणि वत्स’ च्या ग्राउंड फ्लोरला भारतीय स्टेट बॅंकला भाडेतत्वावर दिलं आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे एग्रीमेंट जवळपास 15 वर्षांसाठी करण्यात आलं आहे. याची माहिती Zapkey.com च्या रिपोर्ट्सनुसार झालं. या डीलच्या अंतर्गत अभिषेकला दर महिन्याला 18.9 लाख रुपयांचं भाडं मिळतं. हे भाडं पुढच्या 5 वर्षात वाढून 23.6 लाख आणि 10 वर्षांमध्ये 29.5 लाख होणार आहे.
दरम्यान, असं म्हटलं जातं की बच्चन कुटुंबानं बॅंकेला त्यांच्या बंगल्यात असलेली 3,150 स्क्वेअर फूटची जागा दिली आहे. यात अभिषेक बच्चनला दर महिन्याला मोठी रक्कम मिळते. अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर 280 कोटी असल्याचं म्हटलं जातं. तर अभिषेक हा एक चित्रपट साइन करण्यासाठी 12 कोटी घेतो. मात्र, ‘घूमर’ या चित्रपटासाठी त्यानं 1 रुपया घेतला होता. तरभाडेतत्वावरची ही डील त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ करण्यास नक्कीच मदत करणार.
हेही वाचा : ‘ते लेखक नाही, सेल्समॅन…’; सलीम-जावेद यांच्यावर चित्रपट कॉपी केल्याचे खळबळजणक आरोप
अभिषेक बच्चननं त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील करिअरसोबत स्पोर्ट्समध्ये देखील सक्रिय आहे. त्याची प्रो- कबड्डीमध्ये ‘जयपुर पिंक पॅन्थर’ टीम आहे. चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तो अभिषेक नुकताच स्पोर्ट्स ड्रामा ‘घूमर’ या चित्रपटात दिसला होता. आता तो आगामी चित्रपट ‘बी हॅप्पी’ आणि ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसणार आहे.