Konkona Sen Sharma Bollywoods Black Truth : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं चित्रपटसृष्टीत सेटवर लोकं कसे काम करतात यावर धक्कादायक खुलासे केले आहेत. कधी कोणी विचार केला असेल का की कधी बॉलिवूडमध्ये जात आणि धर्मावरून भेदभाव होतील. पण याच सगळ्या गोष्टींचा खुलासा कोंकणा सेननं केला आहे. ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तिनं सांगितलं की ही चित्रपटसृष्टी पितृसत्ताक असली तरी सुद्धा त्यात जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव केला जातो. कोंकणानं सांगितलं की हेच लोक माणसाची जात आणि वर्ग ठरवतात. त्यासोबत त्यानं कुठे बसायचं आणि काय खायचं हे देखील तेच ठरवतात असा खुलासा तिनं एका मुलाखतीत केला आहे.
सुचारिता त्यागीशी युट्यूब चॅनलवर बोलत असताना कोंकना सेन शर्मानं खुलासा केला की चित्रपटाच्या सेटवर, चित्रपटसृष्टीत फक्त महिलांवर नाही तर त्यासोबत जात, वर्ग आणि लिंग या सगळ्यावरून भेदभाव करण्यात येतो. इथे अनेक समस्या आहेत, पितृसत्ताक आणि वाईट आहे.
कोंकणानं सांगितलं की हा भेदभाव इतका जास्त आहे की खाण्याला घेऊन देखील इथे भेदभाव होतात. त्यांनी सांगितलं की माझं म्हणणं आहे की खाण्यापिण्यात देखील भेदभाव होतात. कोणाला कुठे बसण्याची परवानगी आहे आणि कोणाला तिथे बसण्याची परवानगी नाही? कोणाला काय खायला मिळणार? कोणाचं बाथरुम कुठे असणार? लोकं काय काय करुन स्वत: ला वाचवतात.
कोंकणानं पुढे सांगितलं की जेव्हा महिलांची गोष्ट येते तेव्हा चित्रपटाच्या सेटवर फक्त सीनियर्सला सन्मान मिळतो तर इतर लोकांना ‘फर्नीचर’ सारखी वागणूक देण्यात येते. याविषयी पुढे सांगत कोंकणा म्हणाली, ‘तुम्हाला माहित आहे, जर कोणी सीनियर कलाकार नाही, तर त्यांना कशी वागणूक दिली जाते, तर त्यांना धक्का देखील देण्यात येतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या सगळीकडे पाहायला मिळतात. अशा ठिकाणी काम करणं खूप कठीण आहे. त्यामुळे या सगळ्याची कल्पना देखील करु शकत नाही की यातून जाणं किती कठीण आहे.’
हेही वाचा : ‘भूल भुलैया 3’ संपला तरी थिएटर सोडू नका, दुसरा क्लायमॅक्स मिस कराल! अक्षय कुमारचीही एंट्री…
कोंकणानं हे देखील सांगितलं की ‘चित्रपटाच्या सेटवर लैंगिक शोषणाच्या घटनांविषयी कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात येत नाही. त्याचं कारण म्हणजे लोक घाबरतात. कोंकणाचं हे वक्तव्य मल्याळम चित्रपटसृष्टीतल्या हेमा कमिटीच्या रिपोर्टनंतर समोर आलं आहे. हेमा कमिटी ही यासाठी बनवण्यात आली ज्यात लैंगिक शोषण आणि लैंगिक समानते संबंधित मुद्द्यावर तपास करण्यासाठी करण्यात आली आहे. या सगळ्या तपासात अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.’