Kangana Ranaut Buys New Car : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. तिचा आगामी ‘इमरजन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं याच्या प्रदर्शनाची तारिख रखडली आहे. यादरम्यान, कंगनाचं मोठं नुकसान झालं. कंगनाला तिचा मुंबईतील पाली हिल परिसरात असलेला बंगला 32 कोटी रुपयांना विकावा लागला. मात्र, याचदरम्यान तिने एक आलिशान कारही खरेदी केली आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं आहे.
कंगनानं रेंज रोव्हर ही आलिशान कार खरेदी केली आहे. त्याची किंमत 3 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. यानिमित्तानं कंगनाच्या कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका आलिशान कारची भर पडली आहे. याचा आनंद व्यक्त करत कंगनानं कारसोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सलवार-सूट घालून हातात पुजेचं ताट घेऊन कंगना आपल्या आलिशान कारच्या समोर उभी असल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फोटो तिच्या हिमाचल प्रदेशमधील घरातील आहे. फोटोमध्ये तिच्यासोबत एक लहानसा चिमुकलाही दिसून येत आहे.
कंगनाच्या ‘इमरजन्सी’ चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास सेंसॉरबोर्डानं चित्रपटातील काही सीनवर कात्री लावण्यास सांगितलं आहे. या चित्रपटातून 13 सीन काढून टाकण्याचं सेंसॉरबोर्डाकडून सांगण्यात आलंय. चित्रपटात कंगनानं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात कंगनासोबत महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमन आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘इमरजन्सी’ चित्रपट वादात अडकल्यानंतर कंगनावर आर्थिक संकट कोसळलं होतं. तिच्यावर आपली वैयक्तिक मालमत्ता विकण्याची वेळ आली होती. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तेव्हा तिने आपल्या मालमत्तेचा वापर केला. कंगना म्हणाली, ‘जर तुमच्यावर कधी वाईट वेळ येत असेल तर तुम्ही संपत्ती ही विकू शकता’.
हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ची OTT वर रिलीजनंतरही कोट्यवधींची कमाई; ‘देवरा’ला देतोय टफ
कंगनानं 2017 मध्ये 20 कोटींना ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. हीच प्रॉपर्टी तिनं 32 कोटींना विकली आहे. 2019 मध्ये तिने याठिकाणी मणिकर्णिका फिल्म्सचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊसचं ऑफिस सुरू केलं होतं. ही तिच प्रॉपर्टी आहे, ज्याचा काही भाग 2020 मध्ये मुंबई महानगरपालिकेने पाडला होता.