‘ते लेखक नाही, सेल्समॅन…’; सलीम-जावेद यांच्यावर चित्रपट कॉपी केल्याचे खळबळजणक आरोप

Salim Javed Accused of Copying Movies : सलीम खान आणि जावेद अख्तर यांची जोडी ही बॉलिवूडच्या सगळ्यात यशस्वी लेखकांच्या जोडीपैकी एक आहे. या जोडीनं एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये या दोघांना घेऊन चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या ‘एफआईआर’ या मालिकेचे लेखक अमित आर्यन यांनी सलीम जावेद हे लेखक असल्याचं मानन्यास नकार दिला आहे आणि म्हटलं की ते दोघं लेखक नाही तर चांगले सेल्समॅन होते. 

डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत अमित आर्यन म्हणाले, की ‘मी सलीम-जावेद यांना लेखक मानत नाही. हे एक वादग्रस्त वक्तव्य म्हणून घेऊ शकतात, पण हो, असं वाटतं की संपूर्ण जग त्यांची स्तुती करतं, पण मी नाही. त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवन काळात गोष्टींची नक्कल केली आहे. सलीम-जावेद लेखक नाही कॉपी-राइटर आहेत. आता ते का हे मी तुम्हाला सांगतो.’

सलीम-जावेद लेखक नाही कॉपी राइटर!

अमित आर्यन म्हणाले, सलीम-जावेद यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेची कहानी देखील कॉपी केली होती. त्याविषयी सांगत अमित म्हणाला, ‘त्यांचा शोले हा चित्रपट जो एका व्यक्तीच्या आयुष्यावर आहे ज्याचे हात दरोडेखोरांनी कापले आहेत. ते दोन लोकांच्या मदतीनं त्यांचा सुढ घेऊ इच्छितात. हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या अगदी थोडे दिवस आधी मेरा गांव मेरा देश नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. विनोद खन्ना यांनी दरोडेखोराची भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेचं नाव जब्बर सिंग होतं, शोलेमध्ये हे नाव बदलून गब्बरसिंग करण्यात आलं होतं. तिथे जयंत यांनी एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती तर इथे ती पोलिसाची भूमिका होती. तिथे फक्त एक हात कापण्यात आल्याचं दाखवलं होतं, इथे तर ठाकुरचे दोन्ही हात कापून टाकले होते. तिथे धर्मेंद्रनं सूड घेतला आणि इथे अमिताभ बच्चननं सूड घेतला.’

अमित आर्यन पुढे म्हणाले की शोलेची पटकथा ही ‘दो आंखें और बारह हाथ’ आणि ‘सेवन समुराई’ शी मिळती जुळती आहे. छोट्या पडद्यावर आतापर्यंत सगळ्यात लोकप्रिय शोमधील एक ‘एफआईआर’ च्या राइटर अमित आर्यननं पुढे सांगितलं की सलीम-जावेदची जोडीनं लिहिलेला ‘दीवार’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स चित्रपट ‘गंगा जमुना’ मधून कॉपी करण्यात आला आहे. 

हेही वाचा : आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यनं सलमानला भेट दिली भगवत गीता; भाईजाननं काय केलं पाहा…

बॉलिवूडच्या या दिग्गज जोडीनं सलीम-जावेद यांनी 22 चित्रपटांसाठी काम केलं. त्यांनी ‘शोले’, ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘दोस्ताना’, ‘मिस्टर इंडिया’ सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. 22 चित्रपटांसाठी एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यात क्रिएटिव्ह मतभेद वाढू लागले आणि त्यांनी पुढे एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. 

Source link

Related Posts

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

Vidya Balan…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

शेवटचे अपडेट:26…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’