Aditya Roy Kapur : अनेकांचं तरुणींचा सेलिब्रिटी क्रश हा अभिनेता आदित्य रॉय कपूर आहे. त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवरून नेहमीच चर्चा रंगत असल्याचं आपण पाहतो. त्याच्या फीमेल फॅन्सना तर त्याच्या लव्ह लाइफ विषयी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता असते. दरम्यान, आदित्य रॉय कपूरनं बॉलिवूड अभिनेता करीना कपूर खानच्या ‘व्हाट वीमेन वान्ट’ या शोच्या 5 व्या सीझनच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. करीनानं शोमध्ये तिच्याकडे असलेल्या संधीचा वापर करत आदित्यच्या सगळ्या फीमेल फॅन्सना असलेला प्रश्न विचारला. त्याच्या खासगी आयुष्याविषयी विचारताना करीनानं त्याला त्याच्या नात्याविषयी विचारलं.
आदित्य रॉय कपूरनं या मुलाखतीत मोकळेपणानं सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तर त्यानं मस्करीत म्हटलं होतं की ‘त्याला प्रश्नाची थोडी भिती वाटत होती.’ तेव्हा करीनानं लगेच विचारलं की ‘तो सिंगल आहे की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे?’ त्यावर पुढे करीना म्हणाली की ‘आदित्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलत नाही. तर याप्रश्नावर मस्करीत उत्तर देत आदित्य म्हणाला, ‘माझी लायकी? जर कूल असणं गरजेच आहे तर मी चिलर आहे.’
त्यावर करीना आदित्यला चिडवत म्हणाली, ‘छुपा रुस्तम’. तर आदित्य हसला आणि त्यानं त्याच्या नात्याविषयी सांगितलं. तर लगेच आदित्यला करीनानं पुढचा प्रश्न विचारला की तो कमिटमेंट-फोबिक आहे? उत्तर देत त्यानं सांगितलं की ‘मला माहित नाही. माझे अनेक रिलेशनशिप होते. त्यामुळे मी हे बोलू शकत नाही की मी कमिटमेंट फोबिक आहे कारण माझी जे रिलेशनशिप होते ते खूप काळ टिकून होते. जसं की मी जेव्हा छोटा होतो. 20 वर्षांचा वगैरे तेव्हा मी 5 वर्ष आणि 3 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. तर नाही, मी असा तर मुळीच नाही.’
त्यानं पुढे सांगितलं की ‘मात्र, हे खरं आहे की तुम्हाला कोणासोबत काही करण्यासाठी भाग पाडेल आणि या गोष्टीची जाणीव करून द्यावं लागेल आणि तुम्हाला ते खरोखर हवं आहे असे वाटलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकटं राहणं आवडायलाच नको. कोणी असं असायला हवं जो तुम्हाला अशी जाणीव करून देईल की तुम्हाला त्याच्याचसोबत राहायचं आहे.’
हेही वाचा : सोहेलसाठी ज्याच्यासोबतचा साखरपुडा मोडला त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे सीमा
करीनाशी गप्पा मारताना आदित्य रॉय कपूरनं एका पार्टनरमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्या ज्या त्याला आवडतात त्याविषयी देखील सांगितलं. त्यात तो म्हणाला की ‘विनोदी बुद्धी, प्रामाणिक, कामाला घेऊन जिद्दी असेल आणि जे मनात आहे ते स्पष्टपणे मनमोकळेपणानं बोलणारी.’