Drashti Dhami Pregnency: प्रग्नेन्सीचे 9 महिने पूर्ण झाल्यावर डिलीव्हरी होते, हे सर्वश्रुत आहे. पण एका अभिनेत्रीने प्रग्नेन्सीच्या 10 व्या महिन्यात प्रवेश केलाय. ती आता बाळाची वाट पाहतेय. तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली. आपण बोलतोय ते टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी हिच्याबद्दल. अभिनेत्री दृष्टी लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई होणार आहे. ती सध्या 39 वर्षाची असून आपल्या गरोदरपणाच्या प्रवासाचे अपडेट्स नेहमी सोशल मीडियातील फॅन्ससोबत शेअर करत असते. सध्या अभिनेत्री दृष्टी तिच्या प्रेग्नेंसीमुळे हैराण आहे. आपल्या बाळाची वाट पाहून ती थकली आहे.
दृष्टीची प्रसूती होईना
अभिनेत्री दृष्टीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंड्सच्या रेचेल ग्रीनसोबत तिने स्वत:ची तुलना केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅमेरावर तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, तुम्ही बरोबर ऐकले आहे, बाळ अजून आलेले नाही. यावर तिने कॅप्शन लिहिले की, 41 आठवडे उलटले पण ते अद्याप आले नाही. बेबी आता मला खरच त्रास देऊ लागली आहे. दृष्टी धामीने तिच्या गरोदरपणाच्या 10व्या महिन्यात प्रवेश केला आहे. तिची प्रसूती अद्याप झालेली नाही.
अभिनेत्री दृष्टीकडून एक मजेदार व्हिडिओ शेअर
दृष्टीचे चाहते तिच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या वर्षी एका मुलीला जन्म देणारी दिशा परमार म्हणाली, ‘…आणि माझ्या बाळाला घाई होती, अवघ्या 37 आठवड्यांतच आले.’ एका यूजरने लिहिले की, ‘बेबी दिवाळी येण्याची वाट पाहत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, “चला..आता वाट पाहू शकत नाही बाळा… बाहेर ये.’ दुसऱ्याने लिहिले, ‘दिवाळीला बाळ म्हणेल – तू आमचे स्वागत नाही करणार का?’
दृष्टी पहिल्या मुलाला देणार जन्म
याआधीही दृष्टीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती म्हणत होती, मी वाट पाहून थकली आहे. ही प्रतीक्षा मला मारत आहे. अभिनेत्री दृष्टीचे हे पहिलेच अपत्य आहे. तिने 2015 मध्ये बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले. या अभिनेत्रीने लग्नाच्या 9 वर्षानंतर या वर्षी जूनमध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. दृष्टी मधुबाला हिने एक इश्क एक जुनून, सिलसिला बदलते रिश्तों का, गीत हुई सबसे पराई, एक था राजा और एक थी रानी आणि देश में है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.