नुकताच बाबा झालेला रणवीर सिंग रविवारी रात्री पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसला. दीपिका आणि रणवीर सिंगने गणेशोत्सवाच्या काळातच लेकीच्या जन्मचा सोहळा साजरा केला. 8 सप्टेंबर 2024 रोजी दीपिकाने लेकीला जन्म दिला. जवळपास 21 दिवसांनंतर पहिल्यांदा रणवीर एका कार्यक्रमात दिसला. त्यावेळेचा रणवीर सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
अंबानी कुटुंबाने 29 सप्टेंबर रोजी मुंबईच्या घरी अँटिलिया येथे ‘युनायटेड इन ट्रायम्प’ नावाचा एक सुंदर कार्यक्रम होस्ट केला होता. ज्यामध्ये रणवीर सिंग देखील सहभागी झाला होता. रणवीरने यावेळी पापाराझीसोबत आनंद शेअर केला. ‘बाप झालो रे….’
अंबानीच्या कार्यक्रमात रणवीर सिंग
अंबानी कुटुंबाने पहिल्यांदा एका कार्यक्रमात जवळपास पहिल्यांदा 140 ऑल्पियन आणि पॅरालिंपियन यांना एकत्र आणलं होतं. यावेळी त्यांच्या यशाचा सोहळा साजरा करण्यात आला. यामधून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
दीपिका आणि बाळ
अलीकडेच दीपिकाची आई उज्ज्वला पदुकोण आणि बहीण अनिशा पदुकोण मुंबईत स्पॉट झाल्या. जिथे दीपिकाच्या आईने सांगितले की, आई म्हणजे दीपिका आणि मुलगी दोघीही उत्तम आहेत.
दीपिका प्रसूती रजेवर
दीपिका 2025 पर्यंत प्रसूती रजेवर राहणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. साधारण 6-7 महिन्यांनंतर ती कामावर परत येईल.
या चित्रपटांमध्ये दिसणार
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका ‘2898 एडी’ मध्ये प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती. आता ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यात रणवीरही आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.