Baba Siddique Death : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्ये आपल्या इफ्तार पार्टीसाठी अतिशय लोकप्रिय आहे. अनेक सिने कलाकारांसोबत त्यांचं उठण बसणं आहे. बाबा सिद्दीकी यांचा बॉलिवूडमधील सर्वात जवळचा मित्र कोण?
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेता बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. बाबा सिद्दीकी हे राजकारणासोबतच बॉलिवूडमध्ये देखील अतिशय चर्चेत असतात. बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी कलाकारांमध्ये चर्चेचा विषय असते. बाबा सिद्दीकी हे सलमानच्या अतिशय जवळ असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे सलमान-शाहरुखला बोलतं करणारे देखील बाबा सिद्दीकी असल्याचं सांगण्यात येतं. पण बाबा सिद्दीकी यांच्याजवळचा अभिनेता मात्र तिसरीच व्यक्ती आहे? ज्या व्यक्तीने ही घटना घडताच पहिली रुग्णालयात धाव घेतली?
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेता संजय दत्तने रुग्णालयात पहिली धाव घेतली. संजय दत्त अनेकदा त्याच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये दिसत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये एका इफ्तार पार्टीत बॉलिवूडचे दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील अंतर कमी करण्यात बाबा सिद्दीकीने नकळत मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर दोन स्टार्समधील 5 वर्ष जुने शीतयुद्ध संपुष्टात आले. पूर्वी दोघांमध्ये भांडण व्हायचे, पण आता त्यांच्यात वर्षानुवर्षे खास नाते आहे.
(हे पण वाचा >> Baba Siddiqui : आतिशबाजी, चेहऱ्यावर रुमाल… बाबा सिद्दींकीसोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय झालं? 9.15 ते 9.25 यामधली पूर्ण कहाणी)
कधी भिडले शाहरुख-सलमान
2008 मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला होता. दोघांनी एकमेकांना भेटणे टाळायला सुरुवात केली होती, शेवटी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत ते समोरासमोर आले, त्यामुळे त्यांच्यातील वाद संपला. इफ्तार पार्टीत ते एकमेकांना भेटले. त्यानंतर इफ्तार पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
48 वर्षे काँग्रेस पक्षाचा भाग होता
बाबा सिद्दीकी सुमारे 48 वर्षे काँग्रेस पक्षात होते. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथून ते तीन वेळा आमदार होते. फेब्रुवारीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिममधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते. ते केवळ त्यांच्या राजकीय बाबींमुळेच नाही तर आलिशान पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठीही प्रसिद्ध होते.