Devara: जान्हवी कपूरच्या नावावर चाहत्यांची फसवणूक, 10 मिनिटांच्या सीनसाठी घेतले ‘इतके’ कोटी

Janhvi Kapoor In Devara : ‘देवरा’ चित्रपटामध्ये जान्हवी कपूर आणि जूनियर एनटीआर यांचे ‘धीरे धीरे’ गाणे रिलीज झाल्यानंतर जान्हवीचे चाहते ‘देवरा’  चित्रपटामधील जान्हवीचा अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. ‘देवरा’ चित्रपटामधून जान्हवी कपूरने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. मात्र, जान्हवी कपूरसाठी ‘देवरा’  चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांची फसवणूक झाली आहे.

 ‘देवरा’ चित्रपटाच्या पूर्वार्धात जान्हवीचा चेहराही दिसत नाही. एकूणच संपूर्ण चित्रपटात जान्हवीचा सीन फक्त 10 मिनिटांचा आहे. पण या 10 मिनिटांच्या सीनसाठी जान्हवी कपूरला 5 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या जान्हवी कपूरने ‘देवरा’ चित्रपटामध्ये 10 मिनिटांसाठी भूमिका का साकारली? असा प्रश्न सध्या चाहते सोशल मीडियावर विचार आहेत. 

दरम्यान, ‘देवरा’ चित्रपटाची कथा दोन भागांमध्ये दाखविण्यात आली आहे. दुसऱ्या भागामध्ये जेव्हा ‘देवरा’ चित्रपटाची कहानी पुढे जाते. तेव्हा देवराचा मुलगा वारा (जूनियर एनटीआर) मोठा होतो. तेव्हा जान्हवी कपूरची झलक बघायला मिळते.

‘देवरा’ चित्रपटासाठी जान्हवीने घेतली मोठी रक्कम

जरी ‘देवरा’ चित्रपटात जान्हवी कपूर जास्त प्रमाणात दिसली नसली तरी ‘देवरा’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती जास्त वेळ बघायला मिळणार आहे. त्यामुळेच जान्हवी कपूरने हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. ‘देवरा’ चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे मुख्य कलाकारांना दोन्ही चित्रपटांसाठी फी दिली जाते. त्यामुळेच जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‘देवरा’ 2 मध्ये जान्हवी कपूर पुन्हा तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहे. 

‘देवरा’ चा दुसरा भाग कधी येणार

एका मुलाखतीत कोराताला शिवा यांनी सांगितले की, सध्या त्यांनी ‘देवरा’ 2 चित्रपटासाठी फक्त 25 मिनिटे शूट केलं आहे. जर त्यांना कलाकारांच्या तारखा मिळाल्या तर तो येत्या 6 ते 7 महिन्यांमध्ये संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करू शकतील. याचा अर्थ ‘देवरा’ 2 चित्रपटासाठी चाहत्यांना 1 ते दीड वर्षे वाट पाहावी लागणार आहे. 

Source link

Related Posts

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

Alia Bhatt…

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

Raj Thackeray…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

‘मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने…’, शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, ‘तो खंगला तेव्हा…’

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

ऐश्वर्या – अभिषेकच्या कथित भांडणासाठी ‘ही’ अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

‘समोरच्यासाठी आपण काय आहोत हे समजून घेणं महत्वाचं असतं’; जेव्हा अतुल परचुरेंनी सर्व मित्रांना दाखवला आरसा

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल