Avoid onion and garlic during Navratri: नवरात्रीचा सण अगदी काही तासांवर आला आहे. या नऊ दिवसाच्या सणात अनेकजण नऊ दिवस उपवास ठेवतात. तर काही लोक काही पदार्थ खाणे टाळतात. खरं तर धार्मिक नियमांनुसार काही पदार्थ वर्ज्य असतात. याला आयुर्वेदिक कारणही आहेच. आयुर्वेदानुसार नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खाणे चांगले मानले जात नाही. हे शरीरात आळस, क्रोध आणि नकारात्मकता निर्माण करणारे आहे. नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसणाचा त्याग करणे हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. चला वरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून लांब राहिल्यास काय फायदे होतात.
पचनक्रिया सुधारते
कांदा आणि लसूण हे दोन्ही पदार्थ उष्ण असतात. यामुळे कधी कधी पोटात जळजळ आणि आम्लपित्त होऊ शकते. नवरात्रीच्या काळात नऊ दिवस तुम्ही कांदा आणि लसूण खाणे टाळले तर पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकत. हे न खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेला आराम मिळतो आणि गॅस, ॲसिडिटी सारख्या समस्या कमी होतात.
हे ही वाचा: Navratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe
शरीरातील ऊर्जा शुद्ध करते
कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ खाल्ल्याने शरीर जड होते. परंतु कांदा आणि लसूण न खाल्ल्यास शरीराची ऊर्जा हलकी आणि शुद्ध राहते. यामुळे नवरात्रीत तुमच्या ऊर्जा पातळी चांगली राहते आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटते.
मानसिक शांतता वाढवली जाते
होय, तुमची मानसिक शांतता वाढवण्यासाठी कांदा आणि लसूण खाते टाळा. आयुर्वेदानुसार, कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. यामुळे आक्रमकता, क्रोध आणि उत्तेजना वाढते. यामुळे नवरात्रीच्या काळात हे खाणे टाळल्यास मानसिक शांती मिळते आणि मनही स्थिर राहते. हे तुमची एकाग्रता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते.
हे ही वाचा: Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? ‘ही’ आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर
हार्मोनल संतुलनास मदत करते
कांदा आणि लसूणमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. नवरात्रीच्या काळात हे खाणे टाळा ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)