बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी सिन आता रिऍलिटी शो ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ मधून पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये नीलमचा पती समीर सोनीही होता. ज्यांनी हा शो पाहिला असेल त्यांना नीलमचा तो लिपलॉक सीन आठवत असेल. कारण ही गोष्ट तिने यापूर्वी कधीही केली नव्हती. नीलमने mid-day.com शी खास बातचीत केली आणि झोया अख्तरमुळे हे सगळं कसं शक्य झालं ते सांगितलं.
नीलम कोठारी सोनीने कसा केला किसिंग सीन?
नीलम आणि तिचा पती समीर ‘मेड इन हेवन’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसले होते. स्क्रीनवर कधीही चुंबन घेतलेल्या व्यक्तीसाठी ही एक मोठी गोष्ट होती. नीलम सांगते की, “माझ्या नेकलाइनमध्ये मी नेहमीच काळजी घ्यायची. मी स्वत:ला पूर्णपणे झाकून ठेवले होते आणि काहीही एक्सपोझ करायची नाही. झोयाने मला स्क्रिप्ट सांगितली आणि ती म्हणाली, ‘नीलम, यात एक किसिंग सीन आहे. मी झोयासोबत काम करण्यास उत्सुक होते. पुढे झोया म्हणाली, ‘घाबरू नकोस हा सीन तुमच्या पतीसोबत आहे.’
नीलमला या सीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, जरी हा सीन पतीसोबत करायचा असला तरीही तिथे कॅमेरे आणि क्रू मेंबर होते. जे आमच्या इंटिमेट क्षणांना पाहत होते. त्यामुळे मला लाज वाटत होती, असं नीलम म्हणाली.
आमचा सीन होण्याअगोदर मी समीरला विचारलं की, या अगोदर तू कॅमेऱ्यासमोर किसिंग सीन कसे केले आहेत. तेव्हा पतीने सांगितलं की, डोंट बी रिडीक्युलस तू मला लाज आणत आहेस.’
नीलम पुढे म्हणाली की, केमिस्ट्री असल्यामुळे त्यांनी हा सीन जवळपास दोन टेकमध्ये पूर्ण केला. नीलम कोठारी सोनी यांनी स्वत:वरच विनोद केला आहे.