Prabhas Birthday Special: प्रभासचा 23 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. आता अभिनेता 44 वर्षांचा झाला. साउथ आणि बॉलिवूड चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेल्या प्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? इतकंच नव्हे तर अभिनेता अभिनयाव्यतिरिक्त कोण काम करतो? याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रभासबद्दल कधीही न ऐकलेल्या या गोष्टी, हे ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल.
प्रभासचं नाव काय?
प्रभासचे आज जगभरात फॅन आहेत. पण अभिनेत्याचे खरं नाव काय माहितीये का? प्रभास लोकप्रिय फिल्म मेकर यू सूर्यनारायण राजू यांचा मुलगा आहे. त्याचे खरे नाव उप्पलापति वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू असं आहे.
बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी?
प्रभासने चित्रपट साहोमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला असंच सर्वांना वाटतं. मात्र, असं नाहीये. प्रभासने सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगणच्या अॅक्शन जॅक्शन चित्रपटात एक कॅमियो केला होता. चित्रपटातील गाणं मस्त पंजाबी यात तो सोनाक्षीसोबत दिसला होता.
अभिनेता नव्हतं बनायचं…
अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी प्रभासला हॉटेल बिझनेस करायचा होता. प्रभासला अभिनयात करिअर करायचं नव्हतं. प्रभासला खाण्याची फार आवड आहे. त्यामुळं त्याला होटेलिअर बनायचं होतं. त्यांची आवडती डिशदेखील चिकन बिरयानी आहे.
फुड लव्हर असण्याबरोबरच प्रभासला फिरण्याचीदेखील आवड आहे. रिपोर्टनुसार, चित्रपट रिलीज होण्याआधी तो परदेशात फिरण्यासाठी जातो. राधे श्यामच्या प्रदर्शनाआधीच तो सुट्टीसाठी इटलीला गेला होता. तर, आदिपुरुष रिलीज होण्याआधी तो युएसएला गेला होता. त्याचा फेव्हरेट व्हॅकेशन स्पॉट युरोप आहे.
बाहुबलीसाठी प्रभासने दिले होते इतके वर्ष
प्रभासने त्याचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट बाहुबली फ्रेंचाईजीसाठी एकूण 3.5 वर्ष दिले होते. त्याने जवळपास 600 दिवस या चित्रपटाचे शुटिंग केले होते. बाहुबली द बिगिनिंग च्या रिलीजवेळी त्याने पत्रकारांना सांगितलं होतं की, राजमौलीसाठी मी बाहुबलीला चार वर्षांपेक्षा जास्त वेळ व्यतित केला होता. या प्रकल्पासाठी मी सात वर्षदेण्यासही तयार होतो. बाहुबलीच्या शुटिंगसाठी प्रभासला 10 कोटींची जाहिरातीचा ऑफर मिळाली होती मात्र त्याने नकार दिला होता.