‘मी रेखाची मालिश….’, 68 वर्षीय अन्नू कपूर यांचा मोठा खुलासा, ‘इंटिमेट सीन करताना मी मुलींना…’

Annu Kapoor on Intimate Scene Shooting: ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी इंटिमेट सीनवर आपलं स्पष्ट मत मांडलं असून उत्सव चित्रपटात न्यूड सीन दिल्याचा उलगडा केला. इंटिमेट सीन करताना मी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यादरम्यान त्यांनी किसिंग सीनवरुन प्रियांकासह (Priyanka Chopra) झालेल्या वादाबद्दलही सांगितलं. तुम्ही कोणत्याही देशाचे असलात तरी सेक्स आणि हिंसा तुम्हाला नेहमीच आकर्षित करतं असंही त्यांनी सांगितलं. 

‘7 खून माफ’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना किस देण्यास नकार दिल्याची फार चर्चा रंगली होती. यावर अन्नू कपूर यांनी जे विधान केलं होतं, त्यावरुन प्रियांका फार नाराज झाली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा अन्नू कपूर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. “सात खून माफ चित्रपटात अनेक इंटिमेट सीन होते. विशाल भारद्वाज यांनी मला सांगितलं की, ती (प्रियांका चोप्रा) थोडी लाजत आहे. उत्सव चित्रपटात तर मी रेखाची मालिश केली आहे. जेव्हा मी जुगार खेळून पळतो तेव्हा तर न्यूड सीनही दिले होते. आर के स्टुडिओत ते शूट झालं होतं”. 

पुढे त्यांनी सांगितलं की, “मी विशालला सांगितलं की, जर तिला ठीक वाटत नसेल तर सीनच काढून टाक. त्यावर विशालने असं शक्य नाही सांगितलं. मी ठीक आहे सांगितलं. मी सेटवर मजामस्ती करणाऱ्यातला नाही. मी थोडा गंभीर आहे. मी शॉट दिले. पण सोलो शॉट झाला तेव्हा तो पाहून सिद्धार्थ नावाचा एक असिस्टंट आला आणि म्हणाला सर तुम्हाला मानलं. एवढे सीन केले तेव्हा काही वाटलं नाही आणि आता सेक्स सीन केल्यावर मानलं म्हणतोस”.

जेव्हा प्रियांकाने किस करण्यास दिला नकार, संतापले होते अन्नू कपूर; इतक्या वर्षांनी अखेर सोडलं मौन, ‘इंटिमेट होताना…’

 

“सेक्स आणि हिंसा तुम्हाला नेहमीच आकर्षित करतं. मग तुम्ही कुठलेही असाल. प्रियांका चोप्राने मला किस करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे, पण त्यावरुन फार गदारोळ झाला होता. ती काय म्हणाली मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं, जर मी हिरो असतो तर प्रियांका चोप्राला काही आक्षेप नसता. हिरोला किस करण्यावर कोणत्याच अभिनेत्रीला आक्षेप नसतो. हिरो मी आहे, पण ना चेहरा, ना पर्सनॅलिटी. त्यामुळे समस्या आहे. हीच गोष्ट तिच्या मनाला लागली,” असा खुलासा अन्नू कपूर यांनी केला. 

पुढे ते म्हणाले, इंटिमेट सीन करताना उलट मला थोडं संकुचित वाटायला हवं. मी ज्या मुलींसह इंटिमेट सीन करतो त्यांच्याशी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो. यावेळी त्यांनी शिल्पा शिंदेसोबतची एक आठवणही सांगितली. “मी सेटवर गेलो तेव्हा सीन ऐकल्यावर हसू लागली होती. मी आलू गोंडा खाल्ला आहे असं ती सांगू लागली. मी हसलो नाही. मी तिला रजनीगंधा, इलायची देण्यास सांगितलं. तिने खाल्लं आणि आम्ही शूटसाठी गेलो,” अशी आठवण त्यांनी सांगितली. 



Source link

Related Posts

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

Vidya Balan…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

शेवटचे अपडेट:26…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं…

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18 च्या तजिंदर बग्गाने आपली रणनीती उघड केली, ‘राजकारण खेळणार नाही’

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

बिग बॉस 18: मुस्कान बामणे बाहेर काढले, करण वीर मेहरा ईशा सिंग-अविनाश मिश्राच्या बाँडवर विनोद करतात

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

Sai Pallavi on Indian Army : ‘भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि… साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली…

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’

मुस्कान बामणेने बिग बॉस 18 पोस्ट इव्हिक्शनमध्ये तिची आव्हाने सामायिक केली: ‘ओव्हरथिंक करायला सुरुवात केली’